संपूर्ण दुनियेत कोरोनाचा फैलाव झाला आहे, या व्हायरसला थांबवण्यासाठी आज अर्ध्यापेक्षा जगाने स्वतःला कोंडून घेतले आहे. अनेक सरकारांनी लॉकडाउन जाहीर केलय. पन च्यायला काही लोकांचे माकडहाड सदा वळवळ करत असतेच. जगात अनेक लोक सरकारच्या आदेशांना धाब्यावर बसवत हुंदडताना दिसतात. आपल्याकडे तर असले महाभाग मोजता येणार नाहीत इतके भरले आहेत. नितंबावर फटके बसूनही ही लोक घरात बसत नाहीत. अशा लोकांना समजावणे अशक्य आहे, यासाठी इंडोनेशिया ने निवडला आहे 'च्यायला..' मार्ग.. त्यांनी चक्क भूतांच सहाय्य घेतला आहे.

इंडोनेशियामध्ये दोन मोठी बेटे आहेत, जावा अन सुमात्रा ! यामधील मध्य जावातल्या कोहारजो रिजेंसी गावामध्ये चक्क काही लोकांना भूत बनण्याच्या कामावर ठेवले गेलेय. स्थानिक भाषेमध्ये यांना पोकॉन्ग अस म्हटले जाते. पण च्यायला या भूतांना पुरून उरतील असे राक्षस माणसात आहेत, लोक तरीही हिंडायचे काही थांबले नाही. तेव्हा इंडोनेशियाने अजून एक जबराट आयडिया काढली, 'झपाटलेला वाडा' अस या क्लुप्तीच नाव.

च्या रिपोर्ट नुसार, जे लोक दुसऱ्या शहरांमधून किंवा बेटांवरून आलेले आहेत अन त्यांना क़्वारनटाइन केले गेले आहे, अन १४ दिवस सेल्फ़ आइसोलेशन मध्ये राहायचा सल्ला दिला आहे. असे लोक जर बाहेर फिरताना सापडले तर त्यांना तांदळाच्या शेतांच्या मध्ये असलेल्या अन भुताने झपाटलेल्या अशा घरांमध्ये ठेवण्यात येत आहे.

अर्थात त्यांना जेवण पाणी मिळेल अन रोज मोनीटरही केले जाईल. Coconuts Jakarta नुसार काही लोकांना सेल्फ आयसोलेशन मध्ये ठेवले होते पण त्यांनी नियम तोडले, त्यांना अशा घरात ठेवल गेलंय. जर ते बाहेर पडले नसते तर त्यांना विनाकारण शिक्षा मिळाली नसती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने