दुनिया ही रहस्यांनी भरलेली आहे,विज्ञानाने प्रगती तर केली आहे पण तरीही अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचं रहस्य अजूनतरी विज्ञान सापडवू शकलेले नाही बर्म्युडा ट्रायंगल तर तुम्हाला माहितीच असेल पण च्यायला ह्या एकाच त्रिकोणावर भागतय व्हय आपल !! अजून एक ट्रायंगल आहे, आज आपण या एम- ट्रायंगलचा रहस्य आपण पाहणार आहोत.एम-ट्रायंगलच खर नाव आहे मोल्योबका ट्रायंगल, रशियातल्या पर्म शहराच्या जवळ हे ठिकाण आहे. जगप्रसिद्ध अन जगातल्या सर्वात प्राचीन अशा अरल पर्वतरांगेत एक गाव आहे मोल्योब्का !! खर म्हणजे मोल्योब्का हे गाव अन त्याभोवतिचा प्रदेश म्हणजे हा त्रिकोण, पूर्वी हे इथल्या अन अरल पर्वतरांगेतल्या रहिवास्यांसाठी अत्यंत पवित्र ठिकाण होत. पण म्हणतात ना काळ सगळ बदलवतो.

या त्रिकोणाबद्दल खूप रहस्ये आहेत, सांगितले जाते कि इथे काही दिवस राहणारा माणूस बुद्धिमान होतो (फार उशिरा कळल आम्हाला, दीडशहाणे झाल्यावर) अन इथे जाताच अस वाटत कि इथे काहीतरी दिव्य शक्ती आहे. आजारी माणूस सुद्धा इथे आपोआप ठीक होतो (कोरोना??). इथे फोन काम करत नाही, मोबाईलचे नेटवर्क तर आहे पण फोनला रेंजच येत नाही. गावाजवळ एक छोटीसी टेकडी आहे तिथे मात्र फोन काम करायला लागतो.आकाशात चित्रविचित्र चिन्ह दिसणे, आलेल्या आभाळामधून एक तेजपुंज प्रकाश जमिनीवर येणे. सोबतच म्हणे इथे UFO (एलियन वाल्या) दिसतात म्हणे. 70 मैल इतक्या जमीनीवरच्या प्रदेशाला हे त्रिकोण म्हटले जाते. 1980 मध्ये पहिल्यांदा हे ठिकाण चर्चेत आले, इथे विचित्र आवाज यायला लागले. शोध घेणाऱ्यांनी इथे ट्राफिकचा आवाज रेकॉर्ड केला आहे अन विशेष गोष्ट म्हणजे रस्ता इथून तब्बल 40 किलोमीटर लांब आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने