छत्रपती शिवाजी महाराज अन हिंदवी स्वराज्य !! आदिलशाहीच्या डोळ्यात खुपत होते. महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशाहीने डोळे वटारले होते, अन दुसरा अली आदिलशाह अन त्याची महात्वाकांशी आई बेगम ताज सुलताना यांनी दरबारातील सरदारांना आव्हान दिल, अन मानाचा विडा दरबारात ठेवला. मदमस्त आदिलशहाने हे आव्हान स्वीकारलं अन स्वराज्याची मोहीम हाती घेतली. अफजलखान म्हणजे रणनीती अन कपटनीती यांचा अनोखा संगम होता. तो युद्धात प्रवीण तर होताच पण जिथे त्याला त्याच्यापेक्षा शिरजोर भेटायचा तिथे तो कपटनीती करून जिंकायचा. शिवरायांना एक मोठे बंधू होते, संभाजी राजे !! (इथे गोंधळू नका !! छत्रपती संभाजीराजे अन शिवरायांचे बंधू संभाजीराजे). महाराजांसारखेच शूरवीर, पण या अफजल खानाने संभाजीराजांना कपटाने थर मारले अन शहाजीराजे यांना अटक झाली. आता हा अफजलखान स्वराज्यावर चालून आला होता.

च्यायला !! महाराष्ट्राला आता हिशोब चुकता करायची संधी आयतीच चालून आली होती. अन आपल्या महाराजांनी या संधीच सोने केले.

असा हा अफजल खान,विजापूरवरून निघण्याच्या आधी त्याच्या गुरुकडे गेला. त्याच्या गुरूने सांगितले कि 'अफजल, तुला या स्वारीत फार मोठे अपयश येणार आहे. अन तुज्या जीविताला धोका संभवतो'. पण विडा तर उचललेला, अन स्वतःच्या पराक्रमावर (किंवा कपटीपणावर म्हणा) त्याला कमालीचा विश्वास होता.

पण म्हणतात ना, दैव आपल्या आयुष्यात काय होणार आहे याचे अस्पष्ट संकेत देत असते. स्वराज्यात घुसायच्या आत त्याच्या सैन्यादालाच्या निशाणीचा हत्ती, ढालगज फत्तेलष्कर अचानकपणे मेला.पहाडाएव्हडा पोसलेला अफजल, पण त्याच हृद्यही आपल्यासारखच लहान, त्याच्या मनात शंकेची पाल चूकचुकली. (च्यायला च्या भाषेत सांगायचं तर त्याची फाटली !! आता हातभर कि किती ते काही माहिती नाही बुवा). त्याकाळी सुलतान सरदार यांचा जनानखान अत्यंत सुंदर अशा बायकांनी भरलेला असायचा. अफजलखाणाचाही होता. अन युद्धानंतर पराभूतांचा पहिला लुटला जायचा तो जनानखाना जर आपल्या गुरूची भविष्यवाणी खरी ठरली तर आपल्या बायकांचे काय होईल. आपण आपला कुटुंब कबिला मागे सोडून जात आहोत, अन आपल्याला काही झाले तर, विरोधक अन इतरही त्यांच्यावर तुटून पडतील. आपल्यावर दात खाऊन असलेले विजापूरचे सरदार त्यांना आपापसात वाटून घेतील का ? (स्वराज्यात त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही हे त्याला माहिती होते, पण विजापूरचे सरदार काय करतील हे मात्र त्याला कळत नवते.)

नावाचाच अफजल खान, आपल्या विकृत स्वभावाने त्याने या प्रश्नाचा निकाल लावायचा ठरवला. विजापूर शहरापासून जवळ असलेल्या सुरंग बावडी नावाची एक विहीर होती त्या विहिरीत त्याने त्याच्या बायकांना बुडवून मारलं. आणि त्याच्या जवळच असलेल्या कबरींमध्ये दफन करुन टाकले. ऐकून ६४ कबरी असलेलाविजापूर मधला हा भाग आज ही साठकबरीया या नावाने ओळखलं जातं.आजे अफजल खानाच्या या बायकांच्या कबरी आजही कर्नाटक मधल्या विजापूर जवळील साठकबर नावाच्या गावात अस्तित्वात आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने