कोरोनाने घातलेला हैदोस कमी करण्यासाठी, रोखण्यासाठी भारत सरकारने लॉकडाऊन केल, अन तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच राहिल्याने हे लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्यात आले. लॉकडाऊनमुळे जसे संपूर्ण जगच थांबल्यासारखे वाटायला लागले आहे.

काल एका मित्राचा फोन आला, त्याच लग्न जमलेलं, सगळ ठरलेल पण कोरोना मुळे लॉकडाऊन झाला. बिचारा म्हणत होता, कि एक महिना आधी उरकून घेतलं असत तर किती छान झाल असत नाही का !! विरह म्हणजे काय हे लग्न जमलेल्या अन लांबलेल्या जोडप्यांना विचारा !!उन्हाळा आला कि महाराष्ट्रात अन देशभरातली लगीनसराई सुरु होते, त्याआधी लग्नाची जमवा जमावी होते.अशाच एका जमवलेल्या लग्नाची एक मजेदार गोष्ट समोर आलीय, अन चक्क एकजणाला लग्नच कराव लागलं आहे. या लग्नाची चर्चा सगळीकडे होत आहे.

अहमदाबाद एक डॉक्टर आहेत विवेक मेहता नावाचे, यांचा साखरपुडा बिकानेर मधल्या गंगाशहरच्या पूजाशी झाला होता. विवेकचं अहमदाबादचे तर पूजा गंगापूरची, त्यांचा साखरपुडाही झाला होता. लग्न जमल्यानंतर विवेकला राहवले गेले नाही अन कुणालाही न कळवता २१ मार्चला पूजाला भेटण्यासाठी तिच्या घरी गेले त्यानंतर पुढच्याच दिवशी जनता कर्फ्यु लागला आणि ला लॉकडाऊन झालं, अन विवेक अडकले ते गंगापूरमध्ये. १५ तारखेला तरी आपल्याला घरी जाता येईल अशी त्यांना आशा होती पण अशात लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढला.लग्न जमलेलं, तरीही सामाजीक प्रतिष्ठा, लोक काय म्हणतील, काही कमी जास्त झाल तर अशा अनेक चिंता मुलीच्या बापाला लागून असतात. महिनाभर लग्नाच्या आधी नवरा नवरीने सोबत राहणे त्यांच्यासाठी अत्यंत जिकीरीचे.

होणारा जावई सासरी अडकून पडला आणि मुलीच्या घरच्यांची चिंता वाढली. लग्न न होताच मुलाला किती दिवस असं घरी ठेवून घेणार असा प्रश्न त्यांना सतावत होता. कोर्ट मॅरेजही शक्य नव्हतं दुसऱ्या बाजूला मुलाच्या घरचे अहमदाबादमध्ये असल्यानं लग्न लावणं होतं. शेवटी पूजाच्या वडिलांनी विवेकच्या घरच्या लोकांसोबत चर्चा केली. अन त्यांच्याशिवाय हे लग्न लावण्याचा निर्णय घेण्यात आला. अखेर 30 दिवसांनी विवेक आणि पूजा यांचे घरगुती समारंभात लग्न लावून देण्यात आलं. यावेळी फक्त पूजाच्या घरचे लोक उपस्थित होते. विवेकचे आई-वडील, बहिण भाऊ किंवा इतर नातेवाईकांनी लग्नासाठी ऑनलाइन उपस्थिती लावली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने