कोरोना व्हायरस अन सोशल डिस्टेंसिंग हे शब्द आता आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहेत. या सोशल डिस्टेंसिंग ची अशीच एक आयडिया एका रिक्षावाल्याने केली, जी आनंद महिंद्रा यांना खूप भावली अन च्यायला त्यांनी त्याला चक्क नोकरीची ऑफरच दिली. आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्वीटर वरून एका रिक्षावाल्याचा विडीयो शेयर केला होता. या विदियोमध्ये एक इ-रिक्षा दिसतीये जिच्यामध्ये रिक्षावाल्याने प्रवाशांनी सोशल डिस्टेंसिंग मेंटेन कराव म्हणून खास योजना केली आहे. यासाठी त्याने प्लास्टिकच्या कवरचा उपयोग करत रिक्षेला ५ चेंबर मध्ये वाटल आहे, यामुळे सोशल डिस्टेंसिंग पाळली जाईल.

ज्या माणसाने हा विडीयो बनवला त्यालादेखील रिक्षावाल्याच कौतुक केल्याशिवाय राहावल गेल नाही. "आपल्या देशातल्या लोकांची परिस्थितीनुसार बदल करून जुळवून घेण्याची क्षमत अद्भुत आहे, जेव्हा जेव्हा मी हे पाहतो मी चकित होतो" अशा आशयाच ट्वीट करत आनंद महिंद्रा यांनी आपल्या महिंद्रा एंड महिंद्रा लिमिटेड ऑटो एंड फ़ार्म सेक्‍टर्स च्याडायरेक्‍टर राजेश जेजुरीकर यांना या रिक्षावाल्याला सल्लागार म्हणून नेमण्याचा सल्ला देखील केला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने