मराठी चित्रपटसृष्टीतले अशोक मामा म्हणजे अशोक सराफांना उभ्या महाराष्ट्रात कोण नाही ओळखत ? अशोक सराफ अन निवेदिता सराफ गेली २० वर्षे मराठी चित्रपटसृष्टीची सेवा करत आहेत. तरुण वयात धडाडीने भूमिका करणारे अशोक मामा आजही तितक्याच मेहनतीने भूमिका करताना दिसतात. हिंदी मराठीत एक अलिखित नियमच आहे जणू, कलाकारांच्या मुलांनी कलाकारच बनायचे. पण अशोकमामांचा अन निवेदिता सराफांचा मुलगा मात्र याला अपवाद ठरला आहेत.

अशोक आणी निवेदिता सराफ यांचा मुलगा म्हणजे, अनिकेत सराफ उर्फ नीक याने एक उत्कृष्ट आचारी म्हणजे शेफ होण्याच ठरवलं आहे. अनिकेत हा उत्कृष्ट शेफ आहे पण त्याने अभिनयातही एक यशस्वी पाउल ठेवले आहे. जेव्हा नीक ८ वर्षाचा होता, तेव्हा त्याने नाटकांमध्ये काम केले होते. इतकेच नव्हे तर त्याने Pantomime: The Wizard Of The Oz या कॅनडाच्या व्यावसायिक नाटकातून अभिनयास सुरुवात केली आहे. यामध्ये त्यानी ग्लिण्डा (good witch ) नावाची भूमिका साकारली आहे. या नाटकाचा लेखक दिग्दर्शकसुद्धा तोच आहे.

सराफ पालकांनी निक्ने करिअर म्हणून कोणते क्षेत्र निवडावे याची बंधने घातली नाहीत उलट त्यांनी निकला एखाद्या पक्ष्याप्रमाणे उडू दिले. अनिकेत अनेक परकीय भाषा बोलतो, फ्रेंच मध्ये तर त्याचा हात धरणे अवघड आहे.कॅनडात त्याने इंग्रजी शिकवण्याचे काम देखील केले आहे. आईवडिलांचा हात धरून अनिकेतने अनेक भूमिका पदरात पडून घेतल्या असत्या पण त्यान आपल्याला परदेशात सिद्ध करायचं ठरवलं. बालपणापासूनच त्याला लिहायला आवडायचं, इंग्रजीत कविता लिहिणे हे त्याचे आवडते काम त्याने एक हिंदी शॉर्ट फिल्म देखील तयार करून त्याचे दिग्दर्शनलेखन केले होते.

Global Affair नावाने त्याने स्वतःचे हॉटेल सुद्धा टाकले होते. अगथा क्रिस्टी यांच्या स्पायडर्स वेब माउस ट्रॅप या विदेश नाटकातही त्याच्या भूमिका आहेत. एका व्यक्तीमध्ये इतके गुण ठासून भरलेला हा गुणी मुलगा आपल्या आईवडिलांचाच वारसा चालवतोय.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने