सध्या देशभरात कोरोनाच्या हैदोस घातला आहे अन लोक लॉकडाऊनचं पालन करीत आहे. सरकारने लॉकडाऊन लागू केल्यानंतर घरापासून लांब दुसऱ्या राज्यात वा शहरात राहणाऱ्या लोकांना जीवनावश्यक वस्तूंसाठीही अडचणीचा सामना करावा लागतोय. अनेक जन तर पायी मैलोनमैल चालत आपल्या घरी पोचले.

पण 'च्यायला' काही लोकांना या दिवसातही आपली लफडी आवरता येत नाही. अन या संचारबंदीचा ते एक संधी म्हणून उपयोग करून घेतात.

असाच एक महाभाग राहतो बिहारच्या राजधानी पाटण्याला. याची बायको माहेरी गेली होती अन त्यात झाली संचारबंदी, ती बिचारी पडली आपल्या आईवडिलांकडे अडकून. गुडीया देवा असे तीच नाव तिने आपल्या पती धीरज कुमार विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली अन या दोघांना एक मुलगाही आहे.गुडीया आपल्या माहेरी जेहनाबाद जिल्ह्यात गेली होती जे पाटण्यापासून 60 किमी अंतरावर आहे. त्यात सरकारने लॉकडाऊन लागू केल अन ती तेथेच अडकून पडली. नवरा तिला यायला सांगत होता तेव्हा आपण सगळ्या येण्याजाण्याच्या सुविधा बंद असताना कसे येणार अस त्याला यामुळे धीरज कुमार याचा राग अनावर झाला. त्याने त्यांच्या घराजवळ राहण्याऱ्या प्रेयसीशी लग्न केले आणि तिच्यासोबत घरात एकत्र राहू लागला. हे पहिल्या पत्नीला कळल्यानंतरतिचा पारा चढला आणि तिने पोलिसात तक्रार केली. तक्रारीनंतर धीरज कुमार याला ताब्यात घेण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने