भारतात न्युडल्स म्हणजे मैगी, कोणत्याही दुकानात जा तुम्हाला मैगीच्या पाकिटांची माळ अडकवलेली जरूर दिसणार. आपल्याकडे न्युडल्स अन मैगी हे समानार्थी शब्द. पण मैगी ला मैगी हे नाव कस मिळाल माहितीये ?? नाही ना मग च्यायला आम्ही कशाला आहोत..!!

च्यायला जेव्हा इंजिनियरिंग ला होतो, घरून आलेले पैसे संपले कि मदतीला धावून यायची ती मैगी. आता लॉकडाऊन मध्ये बंद आहोत, तर परत धाऊन आलीय ती मैगी !! अन च्यायला मैगी खातानाच लिहलेला हा लेख.

फार फार पूर्वीची गोष्ट आहे, आटपाट नगर होत... हे आटपाट नगर होत स्वित्झरलंड नावाच्या देशात. इथे राहायचा आपला नायक Julius Michael Johannes Maggi. साल होत १८६०, तर आपल्या नायकाला काहीतरी वेगळ करायचं होत. याकाळी स्वितझरलैंड मधला मिल उद्योग अत्यंत कठीण परिस्थितीमधून जाट होता, अशात आपल्या नायकाला भेटला एक मित्र Fridolin Schuler !! शुलर अन जुलियस दोघेही रेडीमेड खाद्य बनवण्याच्या खटपटीला लागले, एक अस खाद्य जे खूप लवकर तयार होईल.

या दोघांनी दोन प्रोडक्ट मार्केटमध्ये आणले पण दोन्ही वेळा अपयश !! पण आपला नायक काही हार मानणारा नवता. अशात २६ वर्ष निघून गेली त्यांनी एक अस पुठ तयार केले जे डाळी अन वेगवेगळ्या धान्यांपासून बनलेले होते. या पीठाने बनलेले न्युडल्स आणी काही भाज्यांनी मिळून त्यानी एक रेडी टु सूप तयार केले जे पौष्टिक तर होतेच पण सोबतच खूप लवकर तयार होत होते. आता वेळ आली होती नायकाच्या इतिहासात अमर होण्याची, त्यांनी या प्रोडक्टला आपलेच नाव दिले.कामगार वर्गाला लक्ष करून हे बनवले होते, त्यामुळे सरकारने यांना सपोर्टकेला. या उत्पादनाच्या निम्मित्ताने सरकार महिलांनी बाहेर निघून काम करण्याचा प्रोत्साहित करत होती.यानंतर सरकार च्या साह्याने जुलियसने मैगी नावानेच अनेक प्रकारचे सूप बाजारात आणले, सगळे सुपर हिट !! हे सगळ इतका यशस्वी झाल कि पेरीस, बर्लिन, वियांना अन अमेरिकेतही मैगी विकायला लागले.मध्येे मैगी विकत घेतले, अन १९८३ मध्ये पहिल्यांदा मैगी भारतात आल. जगभरात गाजलेलं मैगी भारतातही गाजले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने