कधी डेटिंग app वापरलंय ? निदान Tinder माहिती तर असेलच ?? हाय हेलो पासून सुरु होणाऱ्या चाटिंग... तासातासाच्या कधी बनतात कळतच नाही ना. ? कोरोनामुळे म्हणे या डेटिंगवाल्या app वर लोकांनी भयानक गर्दी करायला सुरवात केलीय. पण एका डेटिंग app वर मात्र एका मुलाची फसवणूक झाली. पण अशी गोड फसवणूक च्यायला कधी आमची का होत नाही ?

क्वारंटाइनच्या कालावधीमध्ये अनेक प्रेमकथा लांबणीवर पडल्या. रोमियो, मजनू घराघरात बंद झालेत पण अशा अनेक कहाण्याही समोर आल्यात ज्या, सुरु झाल्यात. यामध्ये सगळ्यात हटके आहे आजची कहाणी. या मुलाने डेटिंग app वर एका मुलीशी मैत्री केली, तिचा नंबरही मिळवला. पण मुलगी मात्र हुशार, तिने चुकीचा नंबर दिला.

रॉंग नंबर कधी बरोबर लागलाय का ? पण आपल्या पठ्ठ्याच बाशिंगबळ जबरदस्त. हा नंबर होता चक्क एका अभिनेत्रीचा. बिचाऱ्या मुलाने या नंबरवर मेसेज पाठवले अन त्याला कळले कि नंबर चुकीचा आहे, हा एका अभिनेत्रीचा नंबर आहे. मुलाचा विश्वास काही बसेना, पण तो पण तयारीचा. या सर्व गोष्टीची माहिती @codeiehiger या ट्विटर अकाऊंटवरुन या तरुण अभिनेत्रीनेच दिली आहे.
तिने या अनोळखी मुलाबरोबरच्या संवादाचे काही स्क्रीनशॉर्ट शेअर करत नक्की काय काय घडलं हे सांगितलं आहे. पण ही गोष्ट इथेच थांबते तर हा लेख लिहायचं काही कारण होत का ? आपल्या पठ्ठ्याने अभिनेत्रीलाही पटवल दोघ एका व्हच्यूअल डेटवरही गेले. खूप वेबसाईटसणी यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

त्यांचा संवाद कसा सुरु झाला तुम्हीच बघा चाट नंतर दोघांनी एकमेकांना फोटो पाठवले आणि फेसटाइमवरुनही संवाद साधला. यासंदर्भातही या अभिनेत्रीनेच ट्विटवरुन फोटो शेअऱ करत माहिती दिली. ते गप्पा मारु लागले आणि एमेकांच्या प्रेमात पडले. तो अगदी माझ्या टाइपचा मुलगा आहे, जसा मुलगा मी शोधत होते अगदी तसाच तो आहे" असंही या अभिनेत्रीने ट्विट केलं आहे. त्यानंतर कोडीने एकमेकांना पाहिल्यानंतर आता आम्ही दुसऱ्या व्हच्यूअल डेटला जात असल्याचेही तिच्या चाहत्यांना ट्विटवरुन सांगितलं. तिने डेटसाठी केलेल्या खास पेहरावाचा फोटोही ट्विट केला होता. त्याच्याबरोबरची डेट नक्की कशी झाली याबद्दलही कोडीने एका ट्विटर थ्रेडमध्ये सांगितलं आहे. अनेकांनी या दोघांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत तर काहींनी या प्रेमकथेवर आपला विश्वासच बसत नसल्याचे म्हटले आहे. तर काहींंनी या प्रेमकथेला love in the time of corona प्रकारची प्रेमकथा असल्याचे म्हटलं आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने