रामायण अन महाभारत यांच्याशिवाय भारतीय पुरानानांचा विचारच होऊ शकत नाही पण यांमध्ये अनेक अशा गोष्टी आहेत कि ज्या बहुतांश लोकांना माहिती नाहीती.रावणाच मयकन्या मंदोदरी सोबत लग्न झाल होत तर वज्रवला सोबत कुंभकर्ण अन सरमा सोबत बिभिशानच. रावणाच्या लग्नाची गोष्ट सांगितली जाते कि भगवान शंकराच्या एका वरदानामुळे त्याला त्रिलोकात सुंदर अशी पत्नी मंदोदरी मिळाली. आजपर्यंत पाच कन्यांना न चीर कुमारी मानले गेलंय, मंदोदरी ही त्यातली एक (महाभारतात अशीच एक चीर कुमारी आहे, माहिती असेल तर कमेंट मध्ये नाव सांगायला विसरू नका). बुद्धिबळाच्या खेळाचा निर्माण तिनेच रावणाच्या मनोरंजनासाठी केला. अक्षय कुमार, मेघनाद असे महारथी तिच्या पोटी जन्माला आले.

अजून एक गोष्ट प्रचलित आहे कि, रावणाचा मृत्यू फक्त एका विशिष्ट बाणाने होऊ शकतो. अन हा बाण कुठे आहे ही गोष्ट फक्त मंदोदरीलाच माहिती होती. हनुमानाने हा बाण मंदोदरी कडून माहिती घेऊन शोधला अन चोरला अन यामुळेच रामाला रावणाला मारण्यात यश मिळाल.

मंदोदरीने काकेले बिबिशनाशी लग्न ?

रावणाच्या मृत्यूनंतर लंकेचा विध्वंस झाला होता, अन रावणाच्या वंशाचे म्हणाल तर फक्त बिबिषण अन काही स्रिया एव्हडेच शिल्लक होते. रावण वधानंतर मंदोदरी युद्धभूमीवर आली अन शोक करू लागली.तेव्हा प्रभू श्रीरामांनी विनम्रपणे मंदोदरीला बिबिषनाबरोबर लग्न करण्याबद्दल विचारले. सोबतच ते म्हणाले कि तुम्ही लंकेची महाराणी अन जगात अत्यंत बलवान अशा रावणाची विधवा आहात.प्रभू राम त्यानंतर बिबिषणाला सिंहासनावर बसवून अयोध्येला परत गेले. काही दिवस मंदोदरीने स्वतःला महालात कोंडून घेतले होते. नंतर त्या बाहेर निघाल्या न बिबिषनाबरोबर विवाह करायला तयार झाल्या.

काही अभ्यासक या कथेला निव्वळ थोतांड मानतान अन सांगतात कि हे खोत आहे. मंदोदरी संपूर्ण रामायणामध्ये एक महान पतिव्रता म्हणून गौरवलेली आहे ती असे कसे करेल ?? पण अशाच प्रकारचे लग्न तर सुग्रीवानेही केले होते. दक्षिण भारतात कदाचित अशी प्रथा चलनात होती का ?? तुम्हाला काय वाटत नक्की लिहा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने