कधीकधी माणसाला आपण निर्माता असल्याच भ्रम व्हायला लागतो. पण निसर्ग माणसाला आपली जागा दाखवून देतो, कोरोनाने नेमकं तेच काम केलंय. पण निसर्गच तो त्याला काय एक काम आहे का ?? जेव्हा कोरोना फैलावत होता तेव्हा निसर्ग एका वेगळ्या अभियांत्रिकी मध्ये गुंतला होता.

कुठेतरीवाचल होत, वेडे इतिहास घडवतात अन शहाणे तो वाचतात.. आता यात एक ओळ अजून वाढवायला लागेल, च्यायला गाढवं आपल्या प्रतापाने विज्ञान.. जीवशास्त्र बदलवतात

काही दिवसांपूर्वी एक असाच प्रकार झाला, चमत्कारच म्हणायचा ! नेशनल जोग्रफी पाहणाऱ्यांना माहिती असेल कि आफ्रिकेत एक देश आहे केनिया. या केनियात अत्यंत मोठ्या प्रमाणावर वन्यजीव आहेत अन तिथलं नैरोबीच जंगल तर जगात भारी !! अनेकदा आपण आफ्रिका म्हणून नेशनल ज्योग्रफीवर पाहत असतो ते नैरोबीच जंगल. केनियात एक त्सावो नेशनल पार्क आहे, इथल्या प्रकाराने जगात प्रसिद्धी मिळवली आहे. इथे एका नवीन प्रजातीने जन्म घेतला आहे.

या पार्क मध्ये गाढव अन झेब्रा यांच्या मिलनाने एक मुल जन्माला आलं. जन्मलेलं मुल हे गाढव अन झेब्रा यांचा संकर आहे, त्यात दोघांचेही गुण आहेत. हे दिसायला गाढवासारख आहे पण शरीरावर झेब्र्याचे पट्टे आहेत.

शेल्ड्रिक वाईल्डलाइफ ट्रस्ट च्या फेसबुक पेजवर या अनोख्या जनावराला जोन्की हे नाव दिल.मागच्या वर्षी झेब्रा मादी तिच्या एरियापासून लांब गेली होती. अन ती बहुतेक गाढवांमध्ये राहायला लागली. नंतर तिला परत तिच्या एरियामध्ये पाठवण्यात आले. काही दिवसात तिला हे मुल झाल, सुरवातीला अस वाटल कि चिखलामुळे हे अस दिसतंय पण नंतर सगळा प्रकार लक्षात आला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने