मक्का, जगभरातील मुस्लीमांच प्रमुख तीर्थक्षेत्र ! इथल्या मशिदीत वर्षभर गर्दी असते, अन रमजानच्या महिन्याततर हजसाठी आलेल्या लोकांनी अख्ख शहर भरलेले राहत अन मुंगी फिरायलासुद्धा जागा नसते. सांगितले जाते कि या महिन्यात पहिल्यांदा पैगंबरांना गब्रीयल नावाचा देवदूत भेटला होता.

पण कोरोना नावाचा एक सैतान जगात धुमाकूळ घालतोय, या सैतानाला मारण्याचा एकच उपाय आहे. तो म्हणजे याच्यापासून दूर राहणे. धर्म, जात, वर्ण या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून सोशल डीस्टन्सिंग पाळणे.

रमजानचा महिना सुरु झालाय, या महिन्यात मुस्लीम दिवसभर उपवास ठेवतात व अनेक धार्मिक गोष्टी करतात. अशा प्रसंगी मुस्लिमांचे सर्वात मोठे धर्मस्थान असणारे मक्का अन शहरातील काबा लॉकडाऊन मुळे बंद आहे.

यावेळी सौदीचे किंग सलमान म्हणाले कि, पवित्र महिना अशा विचित्र परिस्थितीमध्ये आला आहे कि आपण या जागतिक महामारीमुळे आपली प्रार्थना व्यवस्थित करू शकनार नाही, लोकांच्या आरोग्य या गोष्टी महत्वाच्या आहेत. सौदीमध्ये १५ हजारांच्या वर कोरोनाबाधित आहेत अन 130 वर लोक वारले आहेत या पार्श्वभूमीवर सगळीकडे लॉकडाऊन आहे.

देशातली सगळी पवित्र स्थाने यामध्ये येण्यासाठी परकीय नागरिक अन स्थानिक नागरिक दोघांनाही सौदीने अगोदरच बंदी घातली आहे अन ते बंद आहेत. कोरोनामुळे अशी अभूतपूर्व परिस्थिती ओढवली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने