बॉलीवूडचा लोकप्रिय अन ज्याच्या अभिनयाला पाहायला गर्दी व्हायची असा इरफान खान वयाच्या ५४ व्या वर्षी निधन पावला. अचानक तब्बेत खराब झाल्याने त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती खूप खालावली, गेल्या २ वर्षापासून त्याला न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरचा आजार होता. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी दवाखान्यात त्याने शेवटचे काही श्वास घेतले. काही दिवसांपूर्वीच त्याचा अंग्रेजी मेडियम हा सिनेमा रिलीज झाला होता.

बॉलिवूड असो कि हॉलिवूड!! सगळीकडे आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या इरफान खानच्या जाण्याने आज प्रत्येक सिनेमाप्रेमी हळहळत आहे. इरफान जन्माला १९६७ साली जयपूरमध्ये एका मुस्लीम पठाण कुटुंबात. त्याच पूर्ण नाव साहबजादे इरफान अली खान असं वडील टायरचा करायचे.

मुस्लीम अन पठाण त्यांच्या मांसाहाराबद्दल प्रसिद्ध. इरफानचा जन्म पठाण कुटुंबात झालेला असूनही तो चक्क शाकाहारी होता, तेही लहानपणापासून. इरफानचे वडील चेष्टेने नेहमी पठाणाच्या घरी ब्राह्मण जन्मला आला असे म्हणायचे. सिनेमामध्ये इरफान खानचं स्ट्रगल फार मोठं जेव्हा एनएसडीमध्ये प्रवेश मिळाला अगदी त्याच काळी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. घरची परिस्थिती बेताची त्यात वडिलांचे निधन मग इरफान ने फेलोशिपमधून त्याने आपलं शिक्षण पूर्ण केलं. इरफानने त्याची वर्ग मेत्रिण सुतपा सिकंदरशी 23 फेब्रुवारी 1995 मध्ये लग्न केलं. इरफानच्या कठीण काळात सुतपाने नेहमीच त्याला साथ दिली.सुतपावर त्याच इतका प्रेम होत कि तिच्यासाठी तो धर्म बदलायलाही तयार होता. पण मात्र सुतपाच्या घरातल्यांनी मात्र अशी काही जबरदस्ती केली नाही अन दोघांचं लग्न लावून दिलं. यामुळे इरफानला धर्म बदलायची गरज पडली नाही. इरफानने एकाहून एक सरस सिनेमांत काम केलं आहे. 2005 मध्ये आलेल्या रोग सिनेमात इरफानची महत्त्वपूर्ण भूमिका होती. हासिल सिनेमासाठी इरफानला सर्वोत्कृष्ट खलनायकाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. यानंतर इरफानने लंचबॉक्स,गुंडे, हैदर, पीकू,हिंदी मीडियम, करीब करीब सिंगल सारखे अफलातून सिनेमे केले.

पान सिंग तोमर सिनेमासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने त्याचा सन्मान केला. गेल्यावर्षीपासून तो न्यूरो एंडोक्राइन या आजाराने त्रस्त आहे. 2 वर्षांपूर्वी त्यानं अमेरिकेत या आजारावर उपचार घेतले होते. आजारपणामुळे तो बॉलिवूडपासून दूर होता. मात्र प्रकृती सुधारल्यावर त्यानं अंग्रेजी मीडियमया सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. याआधी रिलीज झालेल्या त्याच्या हिंदी मीडियम सिनेमासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. मात्र आजारपणातचं शूटिंग पूर्ण केल्यानंतर त्याच्या प्रमोशनलाही उपस्थित राहू न शकलेल्या इरफानचा हा शेवटचा सिनेमा ठरला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने