कोरोनाने संपूर्ण दुनियेत धुमाकूळ धाताला आहे. वूहानवरून निघालेला हा विषाणू जवळपास प्रत्येक देशात पोचलेला आहे. या विषाणू पासून सुटका मिळवण्यासाठी सर्व देश युद्धपातळीवर कामाला लागले आहेत.भारतासारख्या देशाने या विषाणूचा संसर्ग कमी राहावा म्हणून, लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. पण या लॉकडाऊन मध्ये अनेक अशा गोष्टी पाहायला मिळाल्या ज्या याआधी कधीही पाहायला मिळाल्या नवत्या. निसर्गाने त्याचे शुद्धीकरण करायला सुरवात केली. ओझोन आवरण स्वतःला ठीक करताय. पण सगळ्यात जास्त गोंधळ चाललाय तो लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये

च्यायला !! नवीन लग्न झालेली जोडपी तर खुश आहेत. पण या क्षेत्रातले दिग्गज अन अनुभवी लोक मात्र वैतागलेत हे मात्र नक्की

भांडणाने प्रेम वाढत अस म्हणतात, अन नवरा बायकोचे भांडण होणे ही एक साधी गोष्ट आहे. पण आता २४ तास एकमेकांचेच तोंड पाहायचे म्हटल्यावर भांडण तर होणारच. काही ज्ञानी माणसांनी सांगितले आहे कि लॉकडाऊन नंतर घटस्पोटाचे प्रमाण खूप जास्त वाढेल.यामध्येच एक महिला आपल्या नवऱ्याला इतकी वैतागली कि तिने त्याला चक्क विकायला काढले. तिने आपल्या घराच्या बाहेर एक बोर्ड लटकावला त्यावर लिहिले होते "My Husband is for sale" म्हणजे "माझा नवरा विक्रीस आहे".

मागच्या काही काळापासून चीनमधेही घटस्पोटाचे प्रमाण वाढले कारण नवरा बायकोंना इतका वेळ सोबत काढायची सावयाची नवती अन याचा प्रभाव त्यांच्या नात्यामध्ये पडला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने