रामायणा पाठोपाठ महाभारताने सध्या भारतातले सगळे रेकोर्ड मोडीत काढायला घेतले आहे. अन या दोन सिरियल्सनी अखिल भारतीय मिम्स परिषदेला खाद्य दिले नसते तर नवल !! तर सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय एक असाच फोटो ज्यामध्ये दिसताहेत महाभारतातले भीष्म पितामह. त्यांच्यामागे काहीतरी दिसतंय.. अर्धवट... पण ते कुलर आहे असा दावा केला जातोय अन चक्क गंगापुत्र भीष्मांनाच ट्रोल केल जातंय

च्यायला, काय आहे या फोटोच रहस्य..?? खरच निर्मात्या दिग्दर्शकाकडून झाली का चूक ?? च्यायला याचा साक्षमोक्ष लागलाच पाहिजे.

मागे तुफान लोकप्रिय अमेरिकन वेब सिरीज गेम ऑफ थ्रोन आली होती, या सिरीयलमध्ये एका सीन मध्ये चुकून स्टील फ्लास्क अन कॉफी कप दिसला होता. तेव्हापासून हे नेटकरी अशाच चुकांच्या सापडवन्याच्या मागे होते अन त्यांना सापडले बिचारे भीष्म पितामह. महाभारताच्या एका एपिसोड मध्ये भीष्म पितामहा बसलेले होते, तेव्हा अचानक लोकांना त्यांच्या मागे असलेले काहीतरी दिसलं, कुलर सारख अन मग झाली ट्रोलिंग ला सुरवात. द्वापरयुगात कुलर आल कुठून ? असे प्रश्न विचारायला लोकांनी सुरु केले.

च्यायला आपल्याकडे गोष्टीच्या खोलापर्यंत कुणी जातच नाही, एकदा सुरु झाले कि झाले, मेंढ्यासारखे मागे मागे... भीष्म पितामहांच्या मागे होता खांब, कोरीव खांब.. अन त्याच नक्षीकाम होत अस... चौकटी चौकटीच्या या नक्षीकामामुळे अन पहिल्यांदाच महाभारत पाहणाऱ्या (बहुदा तेव्हढाच एपिसोड) महाभागाला लागला शोध ..!! अन झाले सुरु...

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने