आज आपल्याला अनेक गोष्टी अवघ्या एका क्लिकवर जाणून घेता येतात. अमेरिकेतली बातमी दुसऱ्या क्षणी आपल्याला कळते. म्हणतात कि हे शतक माहितीच शतक आहे. पण दुनिया इतकी मोठी अन क्लिष्ट आहे कि कितीही शोधा, सापडवा पण काहीतरी उरेलच.च्यायला आज आम्ही अशाच एका रहस्यमय दरी बद्दल सांगणार अहो, जिच्याबद्दल प्रसिद्ध आहे कि आज पर्यंत इला कुणी सापडवू शकलेल नाही.

शांग्री ला घाटी, तिबेट अन अरुणाचल प्रदेश यांच्यामध्ये कुठेतरी स्थित आहे ही रहस्यमय दरी.अस मानल जाट कि शांग्री ला हे चौथी मिती, म्हणजेच वेळ याच्या प्रभावित जागेंपैकी एक काही. म्हनजे इथे वेळ सर्वसामान्यपणे काम करत नाही. अरुण शर्मा यांच्या 'तिब्बत कि वह रहस्यमय घाटी' या पुस्तकात शांग्रीलाचा उल्लेख मिळतो.ते म्हणतात कि एका बौद्ध लामांनी त्यांना सांगितले कि शांग्रीला मध्ये काळाचा प्रभाव नगण्य आहे अन तिथे मन, प्राण अन विचारांची शक्ती एक खास सीमेपर्यंत वाढते.

या जागेबद्दल अनेक किद्वंती आहेत (हिंदू अन बौद्ध ग्रंथातही) एका किद्वंतीनुसार इथे जाणारा माणूस परत कधीही येत नाही. युत्सुंग च्या अनुसार ते इथे गेले होते, तिथे सूर्य चंद्र काहीही नवते तरीही चसगळीकडे एक रहस्यमय प्रकाश होता.तिबेटी भाषेच पुस्तक 'काल विज्ञान' मध्येसुद्धा या घाटीचे वर्णन मिळते. काही लोक तर या ठिकाणाला पृथ्वीचे अध्यात्मिक केंद्र मानतात, तर काही सिद्धाश्रम म्हणतात, ज्याचा उल्लेख महाभारत, रामायण अन वेदांमध्ये आहे.चिन्यांच्या सेनेने या जागेला शोधण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण व्यर्थ !! जगता असे अनेक लोक आहेत जे या जागेचा शोध घेता घेता गायब झाले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने