आज ऋषी कपूर अनंतात विलीन झाले. ऋषी कपूर यांच्या अनेक आठवणी आहेत. त्यातलीच एक, १९७३ साली प्रदर्शित झालेल्या ‘बॉबी’ चित्रपटातील भूमिकेनंतर ऋषी कपूर खऱ्या अर्थाने स्टार म्हणून पुढे आले होते. त्यांच्या या भूमिकेने त्यांनी अनेकांच्या मनावर राज्य केले. नीतू सिंग आणि त्यांची  पहिली भेट १९७४ साली प्रदर्शित झालेला ‘जहरीला इंसान’ या चित्रपटाच्या वेळी झाली होती. या चित्रपटाच्या वेळी ऋषी कपूर आणि त्यांचे प्रेयसीचे भांडण झाले होते. तिला पुन्हा मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत होते. तसेच नीतू त्यांना प्रेयसीला मनवण्यासाठी मदत करत होत्या.

चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले अन दोघे आपापल्या मार्गाला लागले पण ऋषी कपूर यांना नीतू यांची आठवण येऊ लागली. युरोपमध्ये चित्रीकरणात व्यस्त असताना नीतूच्या आठवणीने त्यांनी पत्र लिहिले. ‘मला तूझी आठवण येतेय’ इतकच त्यांनी पत्रामध्ये लिहिले होते. त्यानंतर त्यांच्या नात्याला सुरुवात झाली. त्यांनी ‘खेल खेल’ या चित्रपटात एकत्र काम केले आणि त्यांच्या रिलेशच्या चर्चांना उधाण मिळाले.

ऋषी कपूर आणि नीतू यांच्या रिलेशनशीपच्या चर्चा त्यांच्या घरापर्यंत पोहचल्या होत्या. ऋषी कपूर यांचे वडिल राज कपूर यांना हे कळताच त्यांनी ऋषी कपूर यांना नीतूसोबत लग्न करण्याचा सल्ला दिला होता. अखेर १९७९मध्ये दोघेही लग्न बंधनात अडकले. लग्नसोहळ्यात ऋषी कपूर चक्कर येऊन पडले होते. लग्नातील गर्दीपाहून ऋषी कपूर यांना चक्कर आली असावी असे नीतू यांनी सांगितले.

दरम्यान ऋषी कपूर आणि नीतू यांच्या लग्नसोहळ्याला अभिनेत्री रेखा यांनीदेखील हजेरी लावली होती. रेखा लग्नाला एका नवरी प्रमाणे नटून आल्या होत्या. गळ्यात मंगळसूत्र, भांगेत कुकू आणि कपाळवर टिकली असा शृंगार त्यांनी केला होता. रेखा यांनी लग्न सोहळ्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर रेखा यांनी त्या चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर थेट ऋषी कपूर यांच्या लग्नसोहळ्याला आल्या असल्याचा खुलासा केला. गळ्यात मंगळसूत्र, भांगेत कुकू आणि कपाळवर टिकली हा त्यांच्या चित्रपटातील भूमिकेचा भाग होता असे देखील त्यांनी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने