सलमान खानाचा 'बेवफा सनम' चित्रपट पहिला आहे?? या चित्रपटात सलमानसोबत काम कारणी अभिनेत्री चांदनी तुम्हाला आठवत असेल. बेवफा सनम हा तिचा पहिलाच चित्रपट होता, अन आपल्या पदार्पणातच तिचा सिनेमा सुपरहिट ठरला होता. पण त्यानंतर मात्र चांदणीचा एकही चित्रपट गाजला नाही.

चांदणीचे एकामागोमाग एक चित्रपट फ्लोप झाले, काही दणकून आपटले. या अपयशानंतर ती अचानक बॉलीवूडमधून गायब झाली. 1991 ते 1996 या काळात तिने जवळपास दहा सिनेमे केले होते. आज ही चांदणी कशी दिसते ? कुठे राहते ? काय करते ?? च्यायला आपण शोधूनच काढूयात.

चांदणी भारतात नाहीये, ती विदेशात एक डान्स इन्स्टिट्यूट चालावते. चांदणीचे खरे नाव आहे 'निवेदिता शर्मा' पण बॉलीवूडमध्ये एखाद क्लिशे नाव असावे म्हणून ती चांदणी हे नाव लावायची. अमेरिकेतल्या ओर्लान्डो शहरात ती डान्स क्लासेस घेते.

निवेदिताला लहानपणापासूनच नाचगाण्याची आवड, डान्स हा तिचा जीव कि प्राण. लहानपणी तिने नृत्य शिंकायला सुरवात केली, भविष्यात यातच आपल करियर करायचं हे तिच्या मनात होत पण आपण कधी बॉलीवूडमध्ये येऊ अस तिला स्वप्नातही वाटल नवत. फक्त सतरा वर्षाची असताना तिला सलमान सोबत सनम बेवफा या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

बॉलीवूडमधून बाहेर पडल्यावर चांदनीने लग्न केले, तिला दोन मुलीही आहेत. बॉलीवूडपासुन हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या चांदणीचे बॉलीवूडप्रेम मात्र जस्सच्या तस्स आहे. आपल्या मुलींची नावही तिने करिष्मा अन करीना ठेवली आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने