दूरदर्शन वर पुन्हा प्रदर्शित झालेले रामायण यावेळी सुद्धा करोडो लोकांनी पाहिलं. पण म्हणतात ना बापसे बेटा सवाई. तर आता रामायण पाहणाऱ्या बेत्यांनी आपल्या प्रश्नांनी आपल्या शहाण्या बापांना अक्षरशः भंडावून सोडलं आहे.रामायण बघताना आढळून आल कि रावण जेव्हा सिंहासनावर बसलेला असायचा तेव्हा त्याच्या पायाखाली कुणीतरी असायचं. कोण आहे हा ? अन त्याला तसं का झोपवलं ? असे अनेक प्रश्न लहानग्यांना पडलेले आहेत. च्यायला असले प्रश्न आपल्याला पूर्वी कधी पडले होते का ??. रावणाच्या पायाखाली दुसरा तिसरा कोणी नसून आहे तो शनिदेव. आता मध्ये स्रीवादी संघटनांमुळे चर्चेत आलेले शनिदेव हेच रावणाच्या पायाखाली दिसतात. रावण महाबली, महाज्ञानी त्याने सगळ्या जगालाच नियंत्रणात ठेवले होते. इंद्रदेवाची तर म्हणे त्याच्यासमोर बोबडीच वळायची.

या रावणाने यापुढे जाऊन नवग्रहांना आपल्या मुठीत ठेवलं होत (बिचारा प्लुटो त्यावेळी ग्रहच समाजाला जायचा, त्यामुळे बिचाऱ्याने नाहक मार खाल्ला..). त्या सर्वांना डांबून घेऊन तो लंकेला आला होता. (नवग्रहांना मुठीत ठेवणे, लंकेला घेऊन येणे असा उपयोग अलंकारिक असावा, अन याचा शब्दशः अर्थ न घेता.. ज्योतिषशास्त्रात रावण इतका पारंगत होता कि ग्रह त्याच्या तालावर नाचायचे असा असावा)

जेव्हा मेघनादचा जन्म होणार होता, तेव्हा आपल्या ज्योतिष रावणाने सगळ्या ग्रहांना व्यवस्थित अशा घरांमध्ये बसवलं होत. आपला मुलगा अजय, अमर होईल अशी एकंदरीत सगळी व्यवस्था त्याने केली होती. पण शनिदेवांनी नेमके जन्माच्या वेळी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश केला. (रावणाने बांधलेला पत्याचा बंगला उधळला म्हणा कि). यामुळे झाल अस कि मेघनाद महापराक्रमी झाला जरूर पण तो अल्पायुषी ठरला. च्यायला !! पंगा रावणाशी घेतला होता, रावणही काय साधासुधा गडी थोडाच होता. रावण प्रचंड चिडला अन त्याने शनीच्या पायावर गदा प्रहार केला. एवढं करूनही रावणाचा राग शांत झाला नाही. शनीचा अपमान करण्यासाठी आणि शनिदेवांच्या वक्रदृष्टीपासून लंकेला वाचविण्यासाठी रावणाने शनिदेवांचं तोंड खाली जमिनीकडे करून त्यांना सिंहासनासमोर फेकल अन नेहमी सिंहासनावर बसल्यावर पाय ठेवण्यासाठी रावण पालथ्या शनिदेवांचा उपयोग करत असे. सिंहासनावरून उठताना बसताना रावण शनिदेवांच्या अंगावर पाय ठेवून मुद्दाम त्यांना जोरात दाबत असे.पुढे हनुमानाने नवग्रहांना रावणापासून वाचवले.

च्यायला !! आमचे लेख, आमची भाषा आवडते ना ?? आवडत असेल तर आम्हाला कळवत जा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने