सध्या जमाना नेटफ्लिक्सचा आहे !! अस म्हणणारे आजकाल दूरदर्शन लावून बसलेली दिसतात. कोणत्याही इतर माध्यमांपेक्षा दूरदर्शन सध्या अव्वल आहे. रामायण महाभारताचा पराक्रमच असा आहे.रामायणाला मिळालेला प्रतिसाद तर अभूतपूर्व आहे. यामुळे अनेक जुन्या मालिकांचे पुनःप्रसारण करणार आहेत. महाभारत देखील अशीच एक ऐतिहासिक अन टीवीच्या दुनियेत इतिहास घडवणारी मालिका. बी आर चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेले महाभारत अन त्यांची पात्र आता चर्चेत येऊ राहिली आहेत.आता या महाभारतात मराठी सिनेमा गाजवलेली अभिनेत्री, वर्षा उसगावकर एन्ट्री मारणार आहे. दूरदर्शन वर महाभारत हे रोज दुपारी १२ वाजता अन संध्याकाळी ७ वाजता दाखवले जाते. महाभारतात अनेक आभाळाइतके मोठी अशी पत्रे आहेत.

अर्जुन आणिसुभद्रा, यांचा पुत्र अभिमन्यू यांही पत्नी होती उत्तरा !!

अभिनेत्री वर्षा उसगावकर हिने महाभारत या मालिकेत अर्जुन आणि सुभद्रा यांचे पुत्र अभिमन्यूची पत्नी उत्तरा हीची भूमिका साकारली आहे. चाहत्यांना आपल्या या भूमिकेची आठवण करून देत त्यांनी बहुतेक आज मी साकारलेल्या भूमिकेची मालिकेतून एन्ट्री होणार आहेअसे म्हटले आहे. मालिकेत त्यांची एन्ट्री एका डान्स परफॉर्मन्सने होणार असून या नृत्याचे दिग्दर्शन स्वर्गीय गोपी कृष्ण यांनी निभावले होते. वर्षा उसगावकर यांनी साकारलेल्या उत्तराच्या भूमिकेचे खूप कौतुक देखील झाले होते. त्यांच्यासाठी ही भूमिका म्हणजे आयुष्यात एक अधोरेखित करणारी भूमिका अशी ठरली होती. या अभिनयाची दखल घेत अनेक मराठीहिंदी चित्रपटाच्या ऑफर त्यांना येऊ लागल्या होत्या. हिंदीतील साथ, तिरंगा,दूध का कर्ज,परवाने,बेटा हो तो ऐसा,घरजमाई,घर आया मेरा परदेसी अशे एकापाठोपाठ एक चित्रपट त्यांनी गाजवले. अश्या या हरहुन्नरी अभिनेत्रीला आमचा मानाचा मुजरा..

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने