विवेक ओबेरॉय याने २००२ मध्ये 'कंपनी' या सिनेमामधून आपली कारकीर्द सुरु केली. रामगोपाल वर्मा यांनी हा चित्रपट बनवला होता. विवेक ओबेरॉयने एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून स्वतःला लवकरच दाखवून गेले. पण याच काळात त्याने असे काही केले कि त्याच्या कारकिर्दीवर त्याचा प्रभाव पडला. ऐश्वर्या रॉय, ही सलमानसोबत अफेयरमध्ये पडण्याआधी मॉडेल राजीव मुलचंदानी यांची गर्लफ्रेंड होती.मॉडेलिंग करत असताना दोघे एकमेकांच्या जवळ आले होते. पण ऐश्वर्याच्या सिनेमाच्या पदार्पणानंतर दोघांच ब्रेक अप झालं. अन अशात 'हम दिल दे चुके सनम' च्या सेट वर ऐश्वर्या अन सलमानची भेट झाली.

च्यायला !! मुलींना पहिला ब्रेकअप झाल्याझाल्या दुसरा, अन दुसरा ब्रेक अप झाल्याझाल्या तिसरा कसा बरे मिळतो ?? अन आम्ही मात्र आजन्म सिंगल !! कि, सगळ्या गावात पाउस होतो, अन मी कोरडाच ??

१९९९-२००१ या काळात सलमान अन ऐश्वर्या हे एकमेकांना डेट करत होते. पण हळूहळू त्यांच्यात वाजायला लागल. ऐश्वर्याने नाते संपवायचं ठरवलं, पण आपला 'शुटर' सलमान सगळ इतक्या सहज थोडीच होऊ देणार. ऐशच्या अनेक सेटवर जाऊन सलमानने धिंगाणा घातला अन एकदा तर म्हणे तिच्या घराबाहेरही धिंगाणा घातला.

सलमानसोबत काडीमोड झाल्यावर ऐश्वर्याच्या आयुष्यात विवेक ओबेरॉय आले. 'क्यो हो गया ना' चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी दोघांना 'प्यार हो गया !!'. विवेकने म्हणे ऐश्वर्याच्या तिसाव्या वाढदिवशी 30 गिफ्ट दिले. ऐश्वर्याने कधीही जाहीरपणे नाही सांगितले कि ती विवेकसोबत रिलेशनशिप मध्ये आहे (कोण सांगते?). पण प्रत्येक ठिकाणी दोघे बरोबर जायचे, तेव्हा 'ह' म्हटल्यावर 'हगवण झाली' हे ओळखणाऱ्या मिडीयाला हे ओळखण अवघड गेले नाही.याच दौरण विवेक ओबेरॉय यांनी एक चूक केली. विवेक ने हॉटेलच्या एका रूममध्ये प्रेस बोलावली अन त्यांना सांगितले कि त्याला सलमान कडून जीवे मारण्याची धमकी देणारे फोन येत आहेत. सलमानने म्हणे 42 वेळा फोन केले होते. पण यानंतरच ऐश्वर्या विवेकाचे बिनसले. ऐश ने स्पष्ट सांगितले कि तिचा याच्याशी काहीही संबंध नाहीये. ऐश, विवेकाच्या हातातून अनेक ऑफर निघाले. विवेकने नंतर सार्वजनिक पणे सलमानची माफी मागितली आहे.

'च्यायला' !!, ही बातमी लोकमत अन अमर उजाला या दोन अग्रणी वृत्तपत्रांच्या हवाल्याने देत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने