तू कमळाचा माणूस, तू घड्याळाचा, तू हाताचा, तू बाणाचा माणूस !! असे शब्द निवडणुकांच्या काळात नेहमी कानावर पडतात. अन त्यांचे नवलही वाटत नाही इतके राजकीय पक्ष अन त्यांची चिन्हे आपल्या डोक्क्यात फिट्ट बसलेली आहेत. च्यायला !! आतातर रंगसुद्धा एखाद्या पक्षाच्या मक्तेदारी होतील कि काय अशी शंका यायला लागली आहे.पण खूपशा लोकांना माहिती नसेल कि राजकीय पक्षांची चिन्हे यांचाही एक वेगळा असा इतिहास आहे. बदलत्या राजकारणासोबत बहुतांश सगळ्याच पक्षांची चिन्हे बदलली आहेत. आज आपण कमळाच्या चिन्हाबद्दल माहिती घेणार आहोत.

स्वातंत्र्यानंतर डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली. पाकिस्तानात झालेली हिंदूंची कत्तल, फाळणी, अन काश्मीर प्रश्न यामुळे राष्ट्रवाद हा या पक्षाचा मुळ पाया. करोडो निर्वासितांना आशेचा किरण दिसावा म्हणून या पक्षाचे अधिकृत चिन्ह 'दिवा' हे होते. दिवा हा हिंदू संकृतीच्या पावित्र्याचे प्रतिक, कोणत्याही शुभकार्यात दिवा असतोच असतो.

पण वेळ बदलली अन राजकारणही बदललं, श्यामाप्रसाद मुखार्जीनंतर आता जनसघांची धुरा अटलबिहारी, अडवाणी, नानाजी देशमुख, दीनदयाळ उपाध्याय यांच्याकडे आली. अशात आणीबाणी लागू झाली. अन सगळच काही बदललं (विचारधारेशी Adjustment पहिल्यांदा इथे सुरु झाली?) कॉंग्रेसच्या हुकुमशाहीला विरोध करण्यासाठी भारतीय लोक दल समाजवादी पार्टी आणि काँग्रेस (ओ) अशे वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आले अन स्थापन झाळे, जनता पक्ष या पक्षाचे चिन्ह होते नांगरधारी शेतकरी.

पण दहा दिशांना तोंडे असणारे अन फक्त कोन्ग्रेसविरोधातून एकत्र आलेले असल्याने जनता पक्षाचा गाडा जास्त काही दिवस चालला नाही. दोन वर्षात दोन प्रधानमंत्री त्यांना द्यावे लागले. पण तरीही सावळा गोंधळ चालूच होता. म्हणून जनसंघाचे पूर्वाश्रमीचे लोक यातून बाहेर पडळे अन स्थापना झाली भारतीय जनता पक्षाची. भाजपचे चिन्ह होते कमळ !!

साल होत १८५७, एक मोठा अन भारतव्यापी कट शिजत होता.. भारताला स्वतंत्र करण्याचा, इंग्रजांना उखडून फेकण्याचा अन महाराष्ट्राचा पुत्र नानासाहेब या कटाचा म्होरक्या होता. १८५७ च्या स्वतंत्रयुद्धामध्ये कमळाच्या बियांचे अन चपात्यांचा उपयोग हे संदेश पोचवण्यासाठी करण्यात आले होते. अन म्हणूनच काळातील प्रतिक म्हणून कमळं चिन्ह पक्षाचं अधिकृत चिन्ह म्हणून घेण्यात आल्याच बोललं जातं.एवढंच नाही तर ब्रिटिशांच्या विरोधात या चिन्हाचा वापर बहुतांश वेळा करण्यात आला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने