काही गोष्टी माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घड्तायेत तर काही माणसातला माणूस जिवंत ठेवणाऱ्या !! पण हाताची सगळी बोटे थोडीच चांगली असणार.. अर्थात आपण चांगल्या गोष्टींकडे जास्त लक्ष देऊ. मुंबईमध्ये अशी एक गोष्ट घडली ज्यामुळे मुंबई पोलिसांना नक्कीच अभिमान वाटला असेल.

आकाश गायकवाड, मुंबई पोलीस दलात हवालदार पदावर म्हणून काम करतात. एका लहानागीचे ओपन हार्ट ऑपरेशन होते... अन तिला रक्ताची अत्यंत गरज होती. अशावेळी आकाश धावले अन त्यांनी रक्तदान केले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आकाश गायकवाड यांचं कौतुक केलं असून “आकाश तुझा आम्हाला अभिमान आहे” अशा आशयाचा त्यांना फोन केला.

काल ३ तारखेला हिंदुजा रुग्णालात दाखल १४ वर्षीय सनाफातिम खान या मुलीची ओपन हार्ट सर्जरी होणार होती. तिचा रक्तगट आहे A+ अशात मुंबईमध्ये निसर्ग चक्रीवादळ व करोनामुळे रक्त देण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या योग्य असे कोणीही रुग्णालयात येऊ शकले नाहीत. अशा गंभीर परिस्थितीत रुग्णालयात नेमणुकीस असलेले ताडदेव पोलिस स्टेशनचे पोलीस हवालदार आकाश बाबासाहेब गायकवाड संकटप्रसंगी धावून आले. रक्तदान करून त्यांनी मुलीला जीवनदान दिले.

कोणतीही परिस्थिती असो मुंबई पोलीस नागरिकांसाठी कायमच भक्कम आधार आहे. आकाश गायकवाड यांच्यासारख्या योद्ध्यांना माझा सलाम! अशा भावना मंत्री मोहोदयांनी व्यक्त केल्या आहेत. या संपूर्ण पोलीस कुटुंबाचा प्रमुख म्हणून मला आपल्या पोलीस दलाचा अभिमान आहे अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी आकाश गायकवाड यांचा गौरव केला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने